Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रमहिलांसाठी सक्षम नेतृत्व म्हणून मनिषा राजेश आरसुळ यांच्यावर प्रभाग क्रमांक १७ मधील...

महिलांसाठी सक्षम नेतृत्व म्हणून मनिषा राजेश आरसुळ यांच्यावर प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांचा वाढता विश्वास

पिंपरी–चिंचवड : शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सौ. मनिषा राजेश आरसुळ यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना अनुसरून प्रभागातील विकास आणि नागरिकांच्या तातडीच्या समस्या सोडवणे हेच आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिचंवडेनगर, दळवीनगर आणि शिवनगरी या परिसरांतील नागरिक महिलांसाठी सक्षम, कार्यक्षम आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून मनिषाताई राजेश आरसुळ यांच्याकडे पाहत असून, महिला सुरक्षेला प्राधान्य देणारे, कुटुंबाच्या गरजा ओळखणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे.

स्थानिक नागरिकांनी मनिषा आरसुळ यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रभागातील रहिवासी सांगतात की,मनिषाताईंचा स्वभाव मनमिळावू आहेत्या प्रत्येकाशी संवाद साधतातसमस्या नीट ऐकून घेतातप्रभागात स्वच्छतापाणीरस्तेमहिलांसाठी सुविधा आणि युवकांसाठी रोजगार उपक्रम याबद्दल त्यांची दृष्टी स्पष्ट आहेपरिसराचा खरा विकास करणारं नेतृत्व हवंअसेल तर मनिषाताई योग्य पर्याय आहेत,” असे अनेक नागरिकांचे मत आहे.

मनिषाताई राजेश आरसुळ यांनीही प्रभागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम, तसेच युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रामाणिक सेवा, पारदर्शक कामकाज आणि सर्वांगीण विकास—हाच माझा संकल्प असे मनिषाताई राजेश आरसुळ यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments