Sunday, October 6, 2024
Homeताजी बातमी“देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात, मोदी हे कर्मयोगी आहेत - विरोधीपक्ष नेते देवेंद्र...

“देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात, मोदी हे कर्मयोगी आहेत – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

२५ नोव्हेंबर २०२०
“देशातील नागरिकांना कर्मयोगी आवडतात. मोदी हे कर्मयोगी आहेत ते कर्म करतात. या देशातील नागरिकांना बोलघेवडे लोक आवडत नाहीत. जे केवळ बोलतात काहीच करत नाहीत. करोनाच्या काळात महाराष्ट्राच्या सरकार ने एक नव्या पैश्यांची मदत कोणाला केली नाही. समाजातील कुठल्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत यांनी केली नाही,” असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

ते पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात चिंचवड येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संग्राम देशमुख, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे, उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पीसीएनटीडीएचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी महापौर राहूल जाधव, संघटक सरचिटणीस अमोल थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

“कोरोना काळात देशातील छोट्या छोट्या राज्यांनी आर्थिक पॅकेज तयार केले. गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण देशातील सर्वात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्रला ओळखलं जातं. तिथे मात्र, एका फुटक्या कवडीची मदत केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी राहा आणि कुटुंब सांभाळा आम्ही आमच्या घरी राहतो आणि आमचं कुटुंब संभाळतो. याच्या व्यतिरिक्त कुठलं ही काम महाराष्ट्रात झालं नाही,” असं म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीकेचा बाण सोडला.

“हे सरकार रोज घोषणा करत आणि मागे जातं. म्हणून हे सरकार पलटूराम सरकार आहे. रोज आश्वासन देतात मात्र त्या आश्वासनावर टिकून राहात नाहीत. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील चालू कामाला स्थगिती या सरकारने दिली. महाराष्ट्र स्थगित केला, बंद पाडला. या पेक्षा कुठलं ही कर्तृत्व या सरकार चे नाही. अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच एक नवं काम महाराष्ट्राच्या हिताच केलं नाही. केवळ बदल्या करा आणि माल कमवा हे सुरू आहे. या सर्वांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

देशातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. कोविड आव्हान आपण सर्वांनी पाहिलं आहे. या करोनाच्या आवाहनाच्या काळामध्ये राजकीय पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मुख्यमंत्री, मंत्री हे पंतप्रधान मोदी यांना नावं ठेवायचे आणि टीका करायचे. तेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सामान्य नागरिकांची काळजी करत होते. उद्योगांना त्यांनी भांडवल दिले. नऊ महिने कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही ही व्यवस्था उभी करून दिली. कोविड काळातील कर्जावरील व्याज रद्द करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं आहे. समाजातील विविध घटकांना या आव्हानात जगता आलं पाहिजे यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजद्वारे प्रत्येकाच्या खात्यात पैसे दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

कोविड महामारीत नागरिकांना भरमसाठ नागरिकांना वीजबिलं आली. आम्ही पहिल्यांदा आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील बिलं जमा केली. दोन खोल्यात राहणाऱ्यांना तीस हजारांचा बिल आलं. सरकारला ती बिलं दाखवली. उभ्या महाराष्ट्रात न वापरलेल्या विजेची बिल तुम्ही नागरिकांना देता, त्यावर मंत्र्यांनी बिल सुधारून देऊ आणि बिलात सवलत देखील देण्याचं आश्वासन दिल्याचंबी फडणवीस म्हणाले.

“त्यानंतर काही कालावधी निघून गेला. वीज बिल सवलत मिळणार असल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलं. मग, सात दिवसानंतर राज्याचे ऊर्जामंत्री म्हणाले वीज वापरली तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैशांची सवलत मिळणार नाही असं सांगतात. त्यानंतर ऊर्जा मंत्री म्हणतात, ज्यावेळी घोषणा केली तेव्हा माझा अभ्यासच झाला नव्हता. हे कुठला अभ्यास करतात हे मला देखील समजत नाही. आता म्हणतात कुठल्याही प्रकारची सूट देता येणार नाही. ज्या सरकारने विजेचा शॉक दिला त्या सरकारला मतांचा शॉक देऊन त्यांना जाग करण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यांनी यावेळी नमूद केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments