Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्र‘सिटीझन सेंट’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर, मराठीमध्ये ‘स्थळ’ची बाजी ‘पिफ’च्या चित्रपट पारितोषिकांची...

‘सिटीझन सेंट’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट तर, मराठीमध्ये ‘स्थळ’ची बाजी ‘पिफ’च्या चित्रपट पारितोषिकांची घोषणा

२२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये ‘सिटीझन सेंट’ या टिनाटीन कजरिशविली यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला उत्कृष्ठ चित्रपटाचे महाराष्ट्र शासनाचे ‘प्रभात’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले. तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक जयंत सोमळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्थळ’ या चित्रपटाला मिळाले.

महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  समारोप समारंभात आज संध्याकाळी विविध पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, ‘नॉर्थ अमेरिका मराठी असोसिएशन’ (नाफा)चे अध्यक्ष अभिजीत घोलप, पुणे फिल्म फाऊडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विश्वस्त सतिश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, एमआयटी – एडीटी विद्यापीठाचे प्र कुलगुरू मोहीत दुबे, आंतरराष्ट्रीय ज्यूरी, चित्रपट निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

जॉर्जिया या देशातील चित्रपट ‘सिटीझन सेंट’ला महाराष्ट्र शासनाचे १० लाख रुपयांचे ‘प्रभात’ उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक मिळाले आहे. दिग्दर्शक कजरिशविली आणि निर्माते लाशा खलवशी यांना प्रत्येकी ५ लाख रुपये विभागून मिळणार आहेत.

मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत ‘स्थळ’ या सोमळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे ५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.

मारीया प्रोचाझस्का या पोलिश चित्रपट निर्मातीने दिलेल्या निधीतून दिले जाणारे खास पारितोषिक एफटीआयची विद्यार्थिनी आयेशा जैन हीला देण्यात आले.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या सहकार्याने अमेरिकेतील कॅलिफोर्निया सॅन होजे येथील कॅलिफोर्निया चित्रपट गृहात २७ आणि २८ जुलै २०२४ या दोन दिवशी अमेरिकेतील पहिला मराठी चित्रपट महोत्सव ‘नाफा’ आजोजित करण्यात येणार असल्याची घोषणा ‘नॉर्थ अमेरिका फिल्म असोसिशन’चे अध्यक्ष अध्यक्ष अभिजीत घोलप आणि ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments