Monday, October 7, 2024
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमधील जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी आता गॅसऐवजी क्लोरिन पावडर

पिंपरी-चिंचवडमधील जलतरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी आता गॅसऐवजी क्लोरिन पावडर

कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरिन गॅसगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी गॅसऐवजी क्लोरिन पावडर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

कासारवाडीतील तरण तलावात क्लोरिन गॅसची गळती होऊन १९ जणांना बाधा झाली होती. वेळीच दक्षता घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने तलावाच्या ठेकेदारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कासारवाडीसह केशवनगर, नेहरूनगर, वडमुखवाडी-चऱ्होली, पिंपरीगाव, पिंपळे गुरव अशा सहा तलावांच्या कामाचा ठेका सुमीत स्पोर्ट्स ॲण्ड इक्विपमेंट्स ठेकेदाराकडून काढला आहे.

तरण तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिन गॅसऐवजी क्लोरिन पावडर वापरण्याचा निर्णय घेतला. संभाजीनगर येथील तरण तलावात क्लोरिन पावडरद्वारे पाणी शुद्ध करून जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळेने पावडर वापरण्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यानुसार पावडरचा वापर करूनच तलावातील पाणी शुद्ध केले जाणार असल्याचे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

पाच तलाव पुन्हा सुरू
कासारवाडीतील घटनेनंतर बंद ठेवलेले सातपैकी पाच तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पिंपळे गुरव, पिंपरीगाव, संभाजीनगर, वडमुखवाडी, नेहरूनगर तलाव खुले करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments