Tuesday, December 5, 2023
Homeताजी बातमीचिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष उमेदवार राहुल कलाटें लढणार कि माघार घेणार…?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष उमेदवार राहुल कलाटें लढणार कि माघार घेणार…?

महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे हे अधिकृत उमेदवार असून, बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आज ३ पर्यंत अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून काय होणार याकडे चिंचवडवासियांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान राहुल कलाटे म्हणाले की, मी २०१९ ला चिंचवड विधानसभा लढलेलो आहे. तेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा कोणी विचार केला नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या समोर मी लढलो. त्यावेळी नागरिकांनी भरभरून प्रेम दिले. तसेच राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. पुढे ते म्हणाले की, सचिन अहिर हे आज भेटणार आहेत. बहुदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले असावे, असे त्यांनी सांगितले आहे.

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. राहुल कलाटे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने कलाटे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उद्या पोटनिवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांना खास संदेश पाठवल्याचे समजते. याविषयी माहिती देताना सचिन अहिर यांनी म्हटले की, राहुल कलाटे पूर्वी आमच्या पक्षाचे गटनेते राहिले होते. त्यामुळे त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. राहुल कलाटे यांचं वय पाहता त्यांचं राजकीय भविष्य चांगलं आहे, त्यांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. शेवटी अपक्ष लढण्याला काही मर्यादा असतात. गेल्यावेळी त्यांना चांगली मतं पडली होती. पण त्यावेळी कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिपचा पाठिंबा होता, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बुधवारी रात्री मी स्वत: राहुल कलाटे यांना निरोप दिला आहे. आज उद्धव ठाकरे स्वत:ही राहुल कलाटे यांच्याशी फोनवरुन बोलू शकतात. राहुल कलाटे यांनी मविआला मदत करावी, हाच आमचा प्रयत्न राहील, असे सचिन अहिर यांनी म्हटले. त्यामुळे आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून चिंचवड पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, हे पाहावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments