चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना ( ठाकरेगट ) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञातांनी हा हल्ला केला. त्यात सचिन भोसले जखमी झाले असून त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सायंकाळच्या सुमारास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार सुरू होता. सचिन भोसले हे प्रचारात सहभगी झाले होते. मात्र प्रचार दरम्यान अज्ञात व्यक्तीनी येऊन माराहणा करण्यास सुरुवात केली. त्यात काही जणांनी त्यांच्यावर ब्लेडने देखील वार केल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवड परिसरातील गणेश नगर भागात ही घटना घडली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा शहरप्रमुख भोसले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या काही जणांनी भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. त्यात भोसले यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ता गोरख पाषणाकर याचा पाय मोडला आहे. दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.