Saturday, May 25, 2024
Homeताजी बातमीराम मंदिर उभरणीमध्ये चिमुकल्यांनी उचलला खारीचा वाटा

राम मंदिर उभरणीमध्ये चिमुकल्यांनी उचलला खारीचा वाटा

२८ जानेवारी २०२१,
अयोध्यामध्ये राम मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावर असताना सपूंर्ण भारतातून राम मंदिर उभारणीसाठी निधी जमा होत आहे, यामध्ये सर्व सामान्य नागरिक सहभागी होत असताना लहान बाल गोपालांचाही सहभाग आहे, पिंपरी चिंचवड मधील आदित्य आणि अजिंक्य सौंदडे वय वर्ष दहा या दोन जुळ्या भावंडांनी आपले सर्व बाल मित्र गायत्री सोनजे, दुर्वा निंबाळकर, आरव गुप्ता, स्वयंम पाटील, श्री पवार, उज्वल दुबे, देवांश तोडकर, अनन्या कुलकर्णी, श्रीतेज काळे, या सर्वांना एकत्र घेऊन ते राहत असलेल्या सोसायटीमध्ये घरोघरी संपर्क करून श्रीराम मंदिर निर्माणा साठी निधी गोळा करून तसेच स्वतःची बचत करून जमवलेल्या पैशातून एकूण 11,100/- (अकरा हजार शंभर ) रुपयांचा निधी संकलित केला. दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री विलास जी लांडगे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी गवारे साहेब, श्री.प्रमोद पाटील साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह श्री विलास जी लांडगे,विशेष निधी प्रमुख भोसरी गट अनिल जी सौंदडे. सोसायटीतील सर्व कमिटी सदस्य, सर्व सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments