९ ऑगस्ट २०२१,
राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल (रविवारी) पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाी मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. २२ एप्रिल २०२१ पासून सर्वसामान्य लोकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवास बंद झाला होता. आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यलयात पास उपलब्ध होणार आहे.
“कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती करत होते. तुम्हाला माहीतच आहे की, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


