Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं मुंबईत अनावरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या पुर्णाकृती पुतळ्याचं मुंबईत अनावरण

२३ जानेवारी २०२१,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज २३ जानेवारी रोजी कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “हा क्षण भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईसह महाराष्ट्रावर प्रभाव होता. त्यामुळेच आज त्यांच्या या कार्यक्रमासाठी इतक्या लोकांनी उपस्थिती लावली. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात सर्वांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments