पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ पासून तीन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानास सुरुवात होणार आहे.
या व्याख्यानमालेत विविध मान्यवर वक्ते समकालीन आणि ऐतिहासिक विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
👉 कार्यक्रमाचे वेळापत्रक :
• ०१ मे (शुक्रवार) – माजी खासदार प्रदीप रावत
विषय : “भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम”
• ०२ मे (शनिवार) – इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत
विषय : “अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई”
• ०३ मे (रविवार) – प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे (मार्क्सवाद अभ्यासक)
विषय : “सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?”
यंदा या व्याख्यानमालेचे ४२ वे वर्ष असून, ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे आणि कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा आणि नियोजित वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे.


