Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीपिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात...

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने मोरवाडी, पिंपरी येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट, शेजारी पिंपरी येथे १९ फेब्रुवारी रोजी पार पडला.

युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष नरेश भाऊ जीनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि आदर्श राज्यकारभारावर प्रभावी व्याख्यान दिले. तसेच पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शन केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांचा कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. यावेळी पत्रकार संघाचे सागर सूर्यवंशी, संतोष गोतावळे महावीर जाधव यांच्या सह उपस्थित मार्गदर्शकांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक बुद्धन, अयफज कुरेशी, संदीप शिंदे, विशाल चंपावत, राजकुमार किरवले, गौरव यादव, अनुपम गायकवाड, रोमिओ लोबो, वसीम शेख, प्रवीण पोटभरे, खाजा कुरेशी, फिरोज कुरेशी, अर्जुन कुमार, किरण वावरे, देवा खुशावा, इकबाल शेख, प्रणव जीनवाल, सुमित साळुंखे, दिलीप कुमार आणि निश्चय जीनवाल यांच्या सह नरेशभाऊ जीनवाला मित्र मंडळाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती साजरी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments