लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी व २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये येणा-या विविध सोसायटीमध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री. राजाराम सरगर व स्वीप टिमचे इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या मतदार नागरिकांना १३ मे २०२४ रोजी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले तसेच निवडणूकीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच देशहितासाठी मतदान करा, “ आपले मत, आपला हक्क, चला मतदान करूया ” असा संदेश देण्यात आला आणि त्यांच्याकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.