Saturday, September 30, 2023
Homeक्रिडाविश्वआयपीएलमध्ये आज बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार

आयपीएलमध्ये आज बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार

२५ ऑक्टोबर २०२०,
आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. ११ पैकी ८ सामन्यात पराभव झालेला चेन्नईचा संघ जवळ जवळ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पुढील तिनही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज आहे. त्यानंतर देखील अन्य संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार. या उटल बेंगळुरूने १० पैकी ७ विजय मिळवून १४ गुणांसह गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळवले आहे. प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी आजचा विजय उपयोगी पडू शकतो.

आयपीएल २०२० मध्ये या दोन्ही संघात झालेल्या लढतीत बेंगळुरूने ३७ धावांनी विजय मिळवला होता. एकूण लढतीचा विचार केल्यास चेन्नई १५ विरुद्ध ९ ने पुढे आहे. पण या वर्षी चेन्नई फॉर्ममध्ये नसल्याने या आकड्यांना फार महत्त्व नाही.

आयपीएल २०२० मध्ये या दोन्ही संघात झालेल्या लढतीत बेंगळुरूने ३७ धावांनी विजय मिळवला होता. एकूण लढतीचा विचार केल्यास चेन्नई १५ विरुद्ध ९ ने पुढे आहे. पण या वर्षी चेन्नई फॉर्ममध्ये नसल्याने या आकड्यांना फार महत्त्व नाही.चेन्नई विरुद्ध विजय मिळवून विराटला प्ले ऑफमधील स्थान पक्के करता येईल. गुणतक्त्यात बेंगळुरूसोबतच दिल्ली आणि मुंबईचे प्रत्येकी १४ गुण आहेत. नेट रनरेटमुळे विराट तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे विराटला नेट रनरेट सुधारण्याची संधी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments