Friday, September 29, 2023
Homeक्रिडाविश्वआज आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्जची आरपारची लढाई , मुंबई विरुद्ध हरले...

आज आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्जची आरपारची लढाई , मुंबई विरुद्ध हरले तर प्ले ऑफला मुकणार

२३ ऑक्टोबर २०२०,
चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२० मधील कामगिरी दिवसेदिवस खराब होत चालली आहे. चेन्नईचा पुढील सामना उद्या शुक्रवारी गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज काही युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मान्य केले होते की आमच्यासाठी आयपीएल संपले आहे.

चेन्नई संघाने जर चार ही सामन्यात विजय मिळवला तर १४ गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. पण त्यासाठी अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.

गुणतक्त्यात चेन्नईचा संघ अखेरच्या स्थानावर आहे. संघाचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, गेल्या दोन सत्रात संघातील वरिष्ठ खेळाडू चांगली केली आहे. पण या वर्षी त्यांची कामगिरी खराब झाली आहे. याच खेळाडूंनी २०१८ साली विजेतेपद आणि त्यानंतर २०१९ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

चेन्नईने या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. पण त्या विजयानंतर चेन्नईला यश मिळालेच नाही. गेल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध त्यांचा पराभव झाला आणि आता ड्वेन ब्रावो देखील आयपीएलमधून बाहेर झाला आहे. फाफ डुप्लेसिस वगळता चेन्नईच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला लय सापडली नाही. केदार जाधवला संधी दिल्यावरून भरपूर टीका होत आहे. त्याच्या ऐवजी एन जगदीशनला किंवा संधी मिळत होती.

या उलट मुंबई इंडियन्सचा संघ जबरदस्त फॉममध्ये आहे. सलग पाच विजयानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. तो सामना डबल सुपर ओव्हरमध्ये गेला होता. मुंबईचे गोलंदाज चेन्नईच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. शारजा मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात लढत होत आहे. या मैदानावर प्रथम काही सामन्यात मोठी धावसंख्या झाली होती. पण आता पिच धिमी झाली आहे. मुंबईने जर विजय मिळवला तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के होईल. तसे झाले तर चेन्नई अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments