मुंबई विमानतळावर आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. Bombardier Learjet हे खाजगी विमान धावपट्टीवरून घसरले आहे. आज सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी हा अपघात झाला. या खासगी विमानात आठ जण होत. धक्कादायक म्हणजे, विमान घसरल्यानंतर विमानाला आगही लागली होती.

विशाखापट्टण ते मुंबईदरम्यान VSR एव्हिएशनची Learjet 45 विमानाचे उड्डाण होते. परंतु, मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने हे विमान धावपट्टी २७ वरून घसरले. विमान घसरल्याने विमानाला आगही लागली. दरम्यान, या दुर्घटनेनंतरही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.. मुसळधार पावसाने दृश्यमानता ७०० मीटर होती” अशी माहिती विमान वाहतूक नियामक DGCA ने दिली. व्हीएसआर एव्हिएशन ही नवी दिल्लीस्थित कंपनी आहे. ही कपंनी कॉर्पोरेट प्रवासी आणि इतरांना सुरक्षित आणि परवडणारे विमान प्रवासाची सुविधा पुरवते.