राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.
१२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
“वाहनाला आग लागल्याने अडीच लाख प्रश्नपत्रिका जळून खाक” “आता या प्रश्नपत्रिकांवर पुन्हा काम करून, त्या पुन्हा छापून वेगवेगळ्या विभागांना पाठवाव्या लागतील. त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या विषयांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. यानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल. पुणे विभागाला एकूण १६ लाख प्रश्नपत्रिका लागतात. त्यापैकी अडीच लाख प्रश्नपत्रिकांना आग लागली होती,” असंही शरद गोसावी यांनी नमूद केलं.


