Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीसीईटीच्या तारखांमध्ये पुन्हा बदल..

सीईटीच्या तारखांमध्ये पुन्हा बदल..

देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह आठ अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले वास्तुकला अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी होणार होती ती आता २४ मे रोजी होणार आहे. तसेच एलएलबी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी होणार होती. ती आता २२ मे रोजी होणार आहे. बी. एस्सी नर्सिंगची सीईटी १८ मे रोजी होणार होती. ती परीक्षा आता २८ मे रोजी होणार आहे. बीएचएमसीटी सीईटीची २२ मे ची परीक्षा आता२४ मे रोजी होणार आहे. तसेच बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/ बीबीएम-सीईटी परीक्षा २९ मे रोजी, डीपीएन/पीएचएन सीईटी आणि एम प्लॅनिंग सीईटी परीक्षा २५ मे रोजी होणार आहे.

सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन कक्षाने केले आहे. दरम्यान पीजीपी-सीईटी/एम.एससी (ए अँड एसएलपी)-सीईटी/एम. एमसी(पी अँड ओ)- तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments