Saturday, March 2, 2024
Homeअर्थविश्वपरमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत..? काँग्रेसला शंका

परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत..? काँग्रेसला शंका

३० सप्टेंबर २०२१,
मुंबईसह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मागील काही दिवसांपासून गायब आहेत. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. परमबीर सिंग यांच्या परदेशात पळून जाण्यामागे केंद्र सरकार असू शकते, अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

गांधी भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ‘परमबीर सिंग यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमबीर यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केला.

शेतकऱ्यांसाठी भाजपवाल्यांनी मोदींना भेटावं!

मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीनं व पुरामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटानं हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावीच, त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी, असं आवाहन पटोले यांनी केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments