आज 16 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील दक्षिण कमांड वॉर मेमोरिअल येथे विजय दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस 50 वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाचे प्रतीक आहे.”सर्वात मोठा विजय” ज्यामुळे बांगलादेशचा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला आणि भारत एक प्रादेशिक शक्ती म्हणून उदयास आला. प्रतिस्पर्ध्यावर या निर्णायक विजयासह भारताच्या सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा स्वतःला राष्ट्रीय शक्तीचा एक मजबूत घटक म्हणून पुष्टी दिली.या युद्धा दरम्यान, दक्षिण कमांडने पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या कारवाई पासून देशाच्या सीमांचे वीरतापूर्वक रक्षण केले. दक्षिणेकडील लष्कराच्या जबाबदारीच्या क्षेत्रात लढल्या गेलेल्या उल्लेखनीय लढायांमध्ये लोंगेवाला आणि परबत अलीच्या प्रसिद्ध युद्धांचा समावेश होता ज्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याचा नाश केला होता. लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) भवानी सिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध 10 पॅरा कमांडो बटालियनच्या सैनिकांनी चचरो या पाकिस्तानी शहरावर केलेला हल्ला, शत्रूच्या प्रदेशात खोलवर केलेलीआणखी एक प्रसिद्ध लष्करी कारवाई होती. या लढाया आपल्या सैनिकांच्या जिद्द आणि शौर्याचे उत्तम उदाहरण म्हणून इतिहासाच्या पाना पानावर लिहल्या गेल्या आहेत.
आपल्या महान राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देण्यापूर्वी दोनदा विचारकेला नाही अशा भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक, हवाई दल आणि खलाशांना आदरांजली वाहण्यासाठी या प्रसंगी पुष्पहार अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा पवित्र समारंभ कर्तव्याच्या ओळीत सर्वोच्च बलिदान देणार्या भारतीय शूर सुपुत्रांच्या स्मरणाचा प्रतीक होता. या सोहळ्याला पुणे स्टेशनचे लष्करी जवान उपस्थित होते. समारंभात दक्षिण कमांड वॉर मेमोरियल पुणे येथे १९७१ च्या भारत पाक युद्धातील शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यालयाच्या दक्षिण कमांडच्या सर्व श्रेणींच्या वतीने लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, आर्मी कमांडर, सदर्न कमांड यांनी स्मरणार्थ पुष्पहार अर्पण केला.सर्व उपस्थितांनी पाळलेले मौन या महान राष्ट्राच्या हुतात्म्यांना आकाशात प्रतिध्वनित केले आणि भारताचे रक्षण करण्याच्या त्यांच्या दृढ निश्चयाला श्रद्धांजली अर्पण केली.