दीपावली किंवा दिवाळी हा प्रकाशांचा सण आहे आणि सर्वात जास्त उत्साहात, धुमधडाक्यात साजरा केला जाणारा सण आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे, याच दिवशी भगवान राम, देवी सीता आणि भगवान लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबिजे पर्यंत चालतो. या वर्षी दिवाळीचा सण कधी आहे ते जाणून घेऊया.
पंचांगानुसार, दिवाळीचा सण दरवर्षी प्रमाणे कार्तिक महिन्याच्या १५ व्या दिवसाला साजरा केली जाईल. यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होणार आहे. या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. १२ नोव्हेंबर रोजी अमावस्या तिथी असून, दुपारी २.४५ वाजता सुरू होईल आणि १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५७ वाजता समाप्त होईल.
दिवाळीला लक्ष्मी पूजनाचे महत्व
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या आणि गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, जेव्हा मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा लक्ष्मी मातेची कृपा राहते. म्हणूनच लक्ष्मीपूजनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. असे म्हणतात की, ज्याच्याकडे ज्ञान असते त्याच्याकडे धनही असते. म्हणूनच गणपतीची पूजा केली जाते. तसेच अमावस्या तिथीला देवी लक्ष्मी कोणावर प्रसन्न झाली तर त्याला सुदृढ आरोग्य लाभते असे सांगितले जाते.
अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.
दिवाळीचा सण भगवान रामाच्या विजयाशी संबंधित आहे. असे मानले जाते की, दसऱ्याला लंकापती रावणाचा वध केल्यानंतर प्रभू राम माता सीतेसोबत अयोध्येत परतले. आपल्या राजाचे आगमन होताच अयोध्येतील जनतेने दिवे लावून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. दिवाळी हा सण साजरा करण्याची परंपरा इथून सुरू झाली.
पद्म पुराण आणि स्कंद पुराणातही दिवाळी सणाचे वर्णन आढळते. यामागे एक खगोलशास्त्रीय घटनाही आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार, ग्रहांचा राजा सूर्य कार्तिक महिन्यात आपली स्थिती बदलतो. दिवस लहान आणि रात्र मोठी होत आहेत. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशीही एक मान्यता आहे.
धनतेरस – सोने खरेदीचा शुभ मुहूर्त !
शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून या दिवशी माता लक्ष्मीसोबत धनाची देवता कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी दान केल्याने १३ पट संपत्ती प्राप्त होते. यंदा धनतेरसला पूजा आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कधीपर्यंत आहे ते जाणून घेऊया.
धनतेरसपासून दिवाळीची सुरवात होते असे मानले जाते. या वर्षी १० नोव्हेंबर शुक्रवार रोजी धनतेरस आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाची देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोन्या-चांदीशिवाय भांडीही खरेदी केली जातात. असे मानले जाते की, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरापटीने वाढतात. धनत्रयोदशीचा सण योग्य पद्धतीने साजरा केल्यास वर्षभर पैशाची कमतरता भासत नाही. चला पाहूया धनत्रयोदशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती.
पौराणिक मान्यतेनुसार सांगितले गेले आहे की, आश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून हातात अमृताने भरलेला घडा घेऊन प्रकट झाले. धन्वंतरींना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. धनत्रयोदशी हा भगवान विष्णूच्या धन्वंतरी या अवताराची पूजा करण्याचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व असून या दिवशी खरेदी केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये १३ पटीने वाढ होते असे मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा करण्याची प्रक्रिया सुरू होते.
साजरी करा दिवाळी सत्यम ज्वेलर्ससोबत !
साजरी करा दिवाळी सत्यम ज्वेलर्ससोबत !
सत्यम ज्वेलर्स निगडी (पिंपरी-चिंचवड) शहरातले एक नामांकित ज्वेलर्स. ग्राहक सणा-सुदीला सोन्याची खरेदी करताना सत्यम ज्वेलर्सलाच झुकते माप देतात.
दागिन्यांच्या अप्रतिम कारागिरी, घडणावळीचा रास्त दर आणि दिवाळीच्या खास ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक सत्यम ज्वेलर्समध्ये तुडुंब गर्दी करतात.
आपल्या नम्र आणि मनोभावे सेवेने सत्यम प्रत्येक ग्राहकाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करायला मदत करते.
यंदाच्या दिवाळीत सत्यम ज्वेलर्स ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत आनंद आणि भरभराटीची ऑफर – “सोन्याच्या दागिने खरेदीवर दुप्पट वजनाची चांदी मोफत !”
होय तुम्ही बरोबर वाचलंत ! तुम्ही तुमचा आवडता सोन्याचा दागिना खरेदी केलात कि तुम्हाला मिळणार त्या दागिन्याच्या वजनाच्या दुप्पट चांदी आणि ती ही चक्क मोफत !
आणखी एक गोष्ट, सत्यम ज्वेलर्स आपल्या सेवेत घेऊन येत आहेत पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठे ५००० स्के.फू. चे चांदीच्या दागिन्यांचे दालन – “सत्यम सिल्वर”
आता आपल्याला हवी असणारी कॉर्पोरेट गिफ्टची असंख्य व्हरायटी आपल्याला मिळेल सत्यम सिल्वरच्या भव्य दालनात!
तर मग यंदाची दिवाळी साजरी करू सोनेरी-चंदेरी खरेदीसोबत!