Monday, July 20, 2026
Homeगुन्हेगारीपीएमपीतून पडून महिलेचा मृत्यू 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्याने उलगडला अपघाताचा थरार

पीएमपीतून पडून महिलेचा मृत्यू ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याने उलगडला अपघाताचा थरार

२७ जुलै २०२१,
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बसविलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या दृश्यामुळे एका अपघाताचा उलगडा झाला आहे. बसचा दरवाजा उघडा ठेवल्याने धावत्या बसमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरातील वडकी गावाच्या हद्दीत धनलक्ष्मी वजन काट्याजवळ २९ मार्च २०२१ रोजी पीएमपी बसमधून पडून महादेवी गोरख गायकवाड (वय २३, रा. वडकीनाला) या महिलेचा मृत्यू झाला होता. त्या वेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी या अपघाताची चौकशी केली असता, बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे उघड झाले. त्यामुळे बस चालक प्रवीण शिवाजी कड (वय ४४, रा. पुरंदर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला उपनिरीक्षक ए. एम. काटे यांनी तक्रार दिली.

‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये स्पष्ट दिसले कि संबंधित महिला वडकी येथील बस थांब्यावर उतरण्यासाठी पुढे आली. थांबा जवळ आला तेव्हा महिलेने बस थांबविण्यास सांगितले, चालकाने बस न थांबवता पुढे नेली, त्यामुळे महिला उतरण्यासाठी दरवाजात खाली गेली. त्या वेळी धावत्या बसमधून दरवाजातून महिला रस्त्यावर पडली. पीएमपी बसमधील ‘सीसीटीव्ही’चे फुटेज तपासले असता, चालकाने निष्काळजीपणे बसचा दरवाजा उघडा ठेवल्याचे दिसून आले. त्यातच थांब्यावर बस उभी केली नाही. त्यातून अपघात झाल्याचे स्पष्ट होते. – प्रमोद हंबीर, उपनिरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments