Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमी'सीसीसी' सेंटर तत्काळ सुरु करा - उमहापौर हिराबाई घुले

‘सीसीसी’ सेंटर तत्काळ सुरु करा – उमहापौर हिराबाई घुले

पिंपरी, ता.5 – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत. बेडअभावी बाकड्यावर रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) आणि विलगीकरण सेंटर तत्काळ सुरु करावेत, अशी सूचना उमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर हिराबाई घुले यांनी म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांपासून शहरातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे बेडची कमतरता भासत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सीसीसी सेंटर चालू करण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांच्या घरात जागा नाही. होम आयसोलेशन करिता सुविधा उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी सीसीसी सेंटर सुरु करण्याची नितांत गरज आहे.

मागीलवर्षी बेडची कमतरता होती तेव्हा महापालिकेमार्फत कॉलेज, हॉस्टेलमध्ये सीसीसी, विलगीकरण सेंटर सुरु केले होते. ज्यांच्या घरी विलगीकरणासाटी जागा नाही, कोरोना पॉझिटीव्ह आहे. पण, लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना सीसीसी सेंटरमध्ये दाखल केले जात होते. परंतु, कालांतराने रुग्णसंख्येत घट झाल्याने सीसीसी सेंटर बंद केले होता. आता पुन्हा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यासाठी तत्काळ सीसीसी, विलगीकरण सेंटर सुरु करण्याची सूचना उपमहापौर घुले यांनी प्रशासनाला केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments