मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एक संशयित कार मुंबईकडून पुण्याकडे जाताना दिसून आली. तिला थांबवण्यासाठी इशारा केला असता तेव्हा ती पुढे निघून जाऊ लागली. त्यावेळी पोलीस पथकाने कौशल्याने तिला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात चेक केले असता ४ करोड रुपयाची रोख रक्कम चालक नामे महेश नाना माने (रा. विठा जि. सांगली) व विकास संभाजी घाडगे (रा. शेटफळ जि. सांगली) यांच्याकडे सापडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर कार क्र. (KA 53 MB 8508) क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार चेक करण्यात आली.सदर रक्कमेबाबत विचारपूस करता त्या संबंधी कागदपत्रे अथवा पुरावे व वाहतुक परवाना व त्याबाबतचे कारण त्यांना सांगता आले नाही.लोणावळा ग्रामीण पोलिसांना २८ मार्च रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैधरीत्या शस्त्र व पैशाची वाहतूक होणार आहे. त्या बातमीची शहानिशा व खातर जमा करण्यासाठी पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीणचे एक पथक नेमण्यात आले होते.
पोलिसांकडून सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालू असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कोठून व कशासाठी आणली तसेच लपून छपून कोणतेही कागदपत्र नसताना वाहतूक करताना सापडली. या बाबतची माहिती व शोध घेण्यात येत असून सदर प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहा फौजदार शिताराम बोकड, युवराज बनसोडे, पोलीस हवालदार अमित ठोसर, महिला पोलीस नाईक पुष्पा घुगे, पोलीस नाईक गणेश होळकर, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांनी केली आहे.