११ मार्च २०२१,
पिंपरी चिंचवड शहरात आज दि ११ मार्च २०२१ रोजी ८३४ जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील ८१२ तर शहराबाहेरील २२ जणांचा समावेश आहे. आज मागील २४ तासात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १११५१५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०३८९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८६६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – निगडी प्राधिकरण (८२ वर्षे), पिंपरी (५३ वर्षे), भोसरी (४९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – हिंजवडी (७४ वर्षे) ०१ स्त्री – पुणे (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी रुग्णालय झोन व प्रभाग निहाय कोविड – १९ बाधित रुग्ण संख्या
अ.क्र | रुग्णालय झोन | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या | प्रभाग | कोविड- १९ बाधित रुग्ण संख्या |
१ | आकुर्डी | ७६ | अ | ९९ |
२ | भोसरी | १४६ | ब | १३० |
३ | जिजामाता | १३७ | क | ८५ |
४ | सांगवी | ८७ | ड | १३९ |
५ | तालेरा | ११२ | इ | ९६ |
६ | थेरगाव | ९८ | फ | ८७ |
७ | यमुनानगर | ११३ | ग | १०१ |
८ | वायसीएम | ४३ | ह | ७५ |
एकुण | ८१२ | एकुण | ८१२ |
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.