Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वकॅप्टन अशोक खरातचं कृत्य कसं उघड झालं..? विवाहितेचा व्हिडिओ, ऑफिस बॉय आणि...

कॅप्टन अशोक खरातचं कृत्य कसं उघड झालं..? विवाहितेचा व्हिडिओ, ऑफिस बॉय आणि बरंच काही… वाचा सविस्तर

ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्याविरोधात दाखल झालेल्या लैंगिक शोषणासह गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उच्चस्तरीय ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) स्थापन केले असून, या पथकाने नाशिकमध्ये येत तपासाला सुरुवात केली आहे. प्रकरणाचे धागेदोरे नाशिकसह विविध जिल्ह्यांत पसरले असल्याने सखोल चौकशीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने एसआयटी गठीत केली. पुणे येथील एसआरपीएफ बल गट क्र. १च्या समादेशक (आयपीएस) तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होत तपासाची सूत्रे हाती घेतली.

प्राथमिक तपासात कॅप्टन खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव हा या संपूर्ण प्रकरणाचा ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी कर्मयोगीनगर येथील खरातच्या घराची झडती घेतली असता सुमारे सहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच सिन्नर येथील फार्महाऊसमधून पिस्तूलही हस्तगत करण्यात आले आहे.

दरम्यान, कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचा संशय असून, डिसेंबर २०२५मध्ये ऑफिसबॉयने ५८ महिलांशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संबंधित फुटेजच्या आधारे खरातला ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे.

खंडणी न मिळाल्यानंतर संशयित नीरज जाधवने काही पीडित महिलांना मॉर्फ केलेले फोटो व व्हिडिओ पाठवून धमकावल्याचेही उघड झाले आहे. यापैकी एका पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. तपास सुरू झाल्याने पीडितांना न्याय मिळण्याच्या आशा उंचावल्या असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments