२७ जानेवारी २०२०,
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये ७१वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२० रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपमहापौर श्री तुषार हिंगे, पीसीएमसीचे उपनगराध्यक्ष श्री.विजय यादव छत्रपती पुरस्कार विजेते श्री उदयन देशमुख, श्री. मंदार, आणी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, श्री. ज्ञानेश्वर काळभोर सेक्रेटरी, संचालक श्री. राम रैना, श्रीमती शीतल वरणेकर, श्रीमती राजश्री काळभोर, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या जीएम सुश्री शिरीन वस्तानी, सीआयएसच्या प्राचार्य सुश्री सरबजीत कौर महाल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजास अभिवादन केले आणि सन्मान, अखंडत्व, विविधता आणि “भारत” असे वेगळेपण टिकवून ठेवण्याचे वचन दिले. प्रमुख पाहुण्यांनी जिल्हा व विभागीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच वार्षिक मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाया विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच प्रमुख पाहुण्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मुलांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक केले तसेच देशाचे भविष्य त्यांच्या हातात आहे.अशी माहिती दिली,
या कार्यक्रमाची सुरूवात केंब्रिज कमांडोजच्या सिंक्रोनाइझ फेरी पासून झाली त्याअगोदर एका सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एक-एक करून देशभक्तीपर नृत्य केले.ह्या दिवसाचे मुख्य होते आकर्षण मंत्रमुग्ध करणारे लोक फिटनेस नृत्य. या कार्यक्रमाची सांगता आकाशात तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडून ’वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीताने झाली.