पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते ३५ वयोगटातील इच्छुकांनी त्यात सहभागी होण्यासाठी आज बुधवारपर्यंत (दि.५) सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन आयोजक हर्षवर्धन भोईर यांनी केले आहे.
या स्पर्धेस गेली ७ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यातील काही स्पर्धकांनी अनेक स्पर्धामध्ये गायक म्हणून पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धेमधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवीत आहेत. दोन वर्षे कोवीड महामारीमुळे सदर स्पर्धेमध्ये खंड पडला होता. तो तेवढा कालावधी वगळता स्पर्धा २०१४ पासून अविरत सुरू आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’चे हे यशस्वी ८ वे वर्षे आहे. स्पर्धेचे फॉर्म सव्र्व्हे नं.१६४, मनिषा स्मृती निवास, भोईर नगर, चिंचवड येथे उपलब्ध असून बुधवारी (दि. ५) साडे पाच वाजेपर्यंत फॉर्म स्वीकारले जाणार आहेत.