Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीरेमडेसिवीर’ खरेदी करा, अन्यथा महापालिकेस टाळे लावू-विशाल वाकडकर

रेमडेसिवीर’ खरेदी करा, अन्यथा महापालिकेस टाळे लावू-विशाल वाकडकर

९ एप्रिल २०२१,


कोरोना काळातील भ्रष्टाचार म्हणजे मानवतेला कलंक…..राष्ट्रवादीची टिका


पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मागील दहा दिवसांपासून कोरोना कोविड – 19 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दि. 7 एप्रिल रोजी 2784 रुग्ण बाधित झाले. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 24275 पेक्षा जास्त आहे. शहरातील बहुतांशी कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. बहुतांशी रुग्णांना ऑक्सीजन तसेच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची गरज भासत आहे आणि या इंजेक्शनमुळेच रुग्ण बरे होत आहेत. अशी या इंजेक्शनची तातडीची गरज असताना पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन अगतीकपणे स्थायी समितीच्या ठराव पास होण्याची वाट पहात आहे. मागील स्थायी समितीच्या बैठकीत टक्केवारीसाठी ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी ठराव स्थगित करण्यात आला. टक्केवारीसाठी अत्यवस्थ रुग्णांच्या जीवाशी खेळणे हे मानवतेला कलंक आहे. शहरातील रुग्णांच्या जीवीताचा विचार करुन आयुक्त राजेश पाटील यांनी स्वता:च्या अधिकारात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन खरेदी करावीत आणि हजारो रुग्णांना दिलासा द्यावा. अन्यथा महापालिकेस टाळे ठोकू असा इशारा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला.

वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 8 एप्रिल) मनपा प्रवेशव्दारासमोर स्थायी समितीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. यानंतर आयुक्तांना शिष्ट मंडळाने निवेदन दिले. शिष्टमंडळात वाकडकर यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कुणाल थोपटे आदी उपस्थित होते.

मनपा प्रवेशव्दारासमोर झालेल्या आंदोलनात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, शेखर काटे, कुणाल थोपटे, उपाध्यक्ष प्रसाद कोलते, अकबर मुल्ला, रोहित नखाते, मयूर जाधव, मंगेश बजबळकर, प्रतिक साळुंखे, अमित लांडगे, मनोज वीर, रामदास करंजकर, उपाध्यक्ष ऋषिकेश तापकीर, श्रीनिवास बिरादार, आबा गवळी, अशोक मगर, ऋषिकेश सुर्यवंशी, सैफ शेख, सरचिटणीस असिफ शेख, निखिल दळवी, दिनेश पटेल, शुभम काटे, साईश कोकाटे, प्रशांत सपकाळ, आकाश पवार, अक्षय माचरे, मंगेश असवले, श्रीकांत बुत्ते, निलेश निकाळजे, अशोक बडकुंभ, प्रमोद ताम्हाणे, अक्षय फुगे, त्रियेश चिखले, रमनदिप कोहली, दत्ता देवासी, विनय रासकर, मिहिर भालेराव, हर्षल नाकतोडे आदींनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments