Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमध्ये बंजारा समाजासाठी ‘बंजारा भवन’ उभारण्याची मागणी; महापौर व आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवडमध्ये बंजारा समाजासाठी ‘बंजारा भवन’ उभारण्याची मागणी; महापौर व आयुक्तांना निवेदन

पिंपरी, दि. १ जुलै : पिंपरी-चिंचवड शहरातील बंजारा समाजासाठी स्वतंत्र ‘बंजारा भवन’ / समाज मंदिर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरातील सायन्स पार्क महालनायक किंवा हरितक्रांतीचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल बंजारा समाज, जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज उत्सव समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने महापौर व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात बंजारा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून समाजातील नागरिक विविध सांस्कृतिक व सामाजिक परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत. मात्र, होळी, तीज, संत सेवालाल महाराज जयंती तसेच वसंतराव नाईक जयंती यांसारखे पारंपरिक उत्सव साजरे करण्यासाठी समाजाकडे स्वतःचे कायमस्वरूपी ठिकाण उपलब्ध नाही. त्यामुळे बंजारा समाजासाठी स्वतंत्र बंजारा भवन किंवा समाज मंदिर उभारण्यासाठी महापालिकेने जागा आरक्षित करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, हरितक्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत शहरातील सायन्स पार्क महालनायक अथवा अन्य योग्य ठिकाणाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड गोरसेना अध्यक्ष नितीन किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर व आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये सौ. गीता नितीन चव्हाण, रावसाहेब राठोड, प्रेम पवार, आकाश चव्हाण, सचिन, रमेश राठोड, विनायक चव्हाण, शुभम खैरनार, सतीश चव्हाण, प्रतीक राठोड, रोहित चव्हाण, शुभम चव्हाण, अल्ताप मुजावर, प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments