मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. बुदीती राजशेखर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या श्री. राजशेखर यांचा निवासाचा पत्ता कक्ष क्रमांक ए-१०४, व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९६९९७१३६७४ असा आहे. तसेच निवडणूक निरिक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री. आनंद कटके असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८६०३६५५६६ असा आहे.
निवडणूक निरीक्षक मावळ लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे भेटण्याची वेळ दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.