Sunday, June 15, 2025
Homeअर्थविश्वविविध विकास कामांच्या ३०९ कोटी ५१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता

विविध विकास कामांच्या ३०९ कोटी ५१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मान्यता

राष्ट्रीय नागरी सुधारणा अंतर्गत केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील मलनि:सारण आणि मैला शुद्धीकरण केंद्र उभारणे तसेच पुढील ५ वर्षाकरिता देखभाल आणि दुरुस्ती करणे प्रकल्प राबविणे या विषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकासकामांच्या सुमारे ३०९ कोटी ५१ लाख रुपये खर्चास गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

महापालिका भवनात कै. मधूकरराव पवळे सभागृहात गुरुवारी (दि. ६ जानेवारी) झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. शहरातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना अधिक संधी मिळावी यासाठी महानगरपालिका विदयार्थी खेळाडू दत्तक योजना राबविते. मागील वर्षीच्या कोरोना काळातील या दत्तक खेळाडूंना आहार भत्ता आणि नव्याने खेळाडूंचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णयही या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनमध्ये प्रत्येक खेळाडूला हजेरी पत्रकाच्या नोंदीनुसार २०० रुपये प्रतिदिन दिला जात होता. आता कोरोना काळातील या खेळाडूंना ५० टक्के आहारभत्ता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

तसेच मनपाच्या जलनि:सारण विभागाकडील राष्ट्रीय नागरी सुधारणा अंतर्गत केंद्रशासनाच्या अमृत योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील मलनि:सारण व्यवस्था आणि मैलाशुद्धीकरण केंद्र उभारणे तसेच पुढील ५ वर्षाकरिता देखभाल आणि दुरुस्ती प्रकल्पासाठी ११२ कोटी २६ लाख रुपये, प्रभाग क्र.४ दिघी गावात ठिकठिकाणी स्ट्रॉर्म वॉटर लाईन टाकण्यासाठी९५ लाख ७४ हजार रुपये, प्रभाग क्र.११ मधील विविध रस्त्यांची हाँटमिक्स पद्धतीने देखभाल दुरूस्ती करण्यासाठी ५३ लाख ७५ हजार रुपये, प्रभाग क्र.१२ येथील देवी इंद्रायणी परिसरातील अस्तित्वातील रस्ते खडीमुरूम आणि डांबरीकरण करण्यासाठी ५१ लाख ४६ हजार रुपये, प्रभाग क्र.१२ चव्हाणवस्ती ते स्मशानभुमी पर्यंतचा रस्ता खडीमुरूमासह डांबरीकरण करण्यासाठी ५० लाख १५ हजार रुपये, प्रभाग क्र.१२ बाठेवस्ती लक्ष्मीनगर व कँनबे चौक परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५६ लाख १२ हजार रुपये, प्रभाग क्र.१२ तळवडे येथिल कहारमाथा परिसरातील जुने अस्तीत्वातील रस्त्यांचे खडीमुरुमीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ६१ लाख ४६ हजार रुपये, प्रभाग क्र.१२ तळवडे येथील तळवडे चिखली हद्द परिसरातील जुने अस्तीत्वातील रस्त्यांचे खडीमुरुमीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी ६२ लाख १९ हजार रुपये, प्रभाग क्र.११ मधील अजंठानगर येथील पुनर्वसन प्रकल्पातील अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी ६२ लाख ८१ हजार रुपये, प्रभाग क्र.२५ वाकड येथील विकास आराखडयातील दत्त मंदीर रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसीत करण्यासाठी ४५ कोटी ९१ लाख रुपये, मुख्य प्रशासकीय इमारतीतमध्ये फर्निचरची व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी ५९ लाख ५७ हजार रुपये, प्रभाग क्र ३२ सांगवी मधील जलतरण तलावाचे आधुनिक पध्दतीने नुतनीकरण करण्याकामी २ कोटी ८५ लाख रुपये, प्रभाग क्र.८ मधील सेक्टर नं. ४,१०,८ आणि इतर ठिकाणच्या रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी ५१ लाख ९४ हजार रुपये, वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागामार्फत मनपाकडील विविध विभागाचे वापरात असलेली सर्व प्रकारची वाहने दुरुस्ती करणेत येतात.

सदरची वाहने वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांचे कार्यालयीन कामासाठी वापर करीत असतात त्याची त्वरीत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने तीन वर्ष कालावधीकरीता दुरुस्तीसाठी १ कोटी १७ लाख रुपये, भोसरी नेहरुनगर येथील एमआयडीसी जे ब्लॉक, ओपन स्पेस क्र. ५६ आणि निगडी सेक्टर क्र. २३ येथील गायरान जागेमध्ये कचरा संकलनासाठी ट्रान्सफर स्टेशन उभारणे अंतर्गत स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ९ कोटी ५० लाख, कासारवाडी येथील मैलाशुध्दीकरण केंद्राजवळ, सांगवी स्मशानभुमीजवळ व थेरगांव येथील एम एम शाळेजवळील चिंचवड पुलाजवळ कचरा संकलनासाठी ट्रान्सफर स्टेशन उभारणे अंतर्गत स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ११ कोटी ६७ लाख रुपये, प्रभाग क्र.१६ मधील रावेत भागातील सर्व्हे नं.१०५ ते १३२ पर्यंतचा १८.०० डी.पी.रस्ता आणि इतर रस्ते विकसीत करण्यासाठी १४ कोटी १२ लाख रुपये, वाल्हेकरवाडी मुख्य रस्ता ते अंडरपास रस्ता डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ५६ लाख या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments