Monday, May 12, 2025
Homeताजी बातमीMPSC 2021: मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्यास कारवाईचा इशारा

MPSC 2021: मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्यास कारवाईचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पूर्व परीक्षा पुढे ढकल्याने विद्यर्थ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. यातच आयोगाने उमेदवारांना इशारा दिला आहे. एमपीएससी ने सुरू केलेल्या मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांशी काही उमेदवार अर्वाच्य भाषेत वाद घालत असल्याचे, धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उमेदवारांचे आक्षेपार्ह संभाषण आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याचा इशारा एमपीएससीने दिला आहे.

एमपीएससीने या बाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर बुधवारी प्रसिद्ध केले. एमपीएससीने २ मार्चपासून उमेदवारांच्या अडचणी, शंका निवारणासाठी नि:शुल्क दूरध्वनी मदत केंद्र सुरू केले. या मदत केंद्रावर मदतीसाठी संपर्क केल्यानंतर काही उमेदवार मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत वाद घालत असल्याचे, कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय सेवेत प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांकडून अशा प्रकारच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे मदत केंद्र सुरू करण्याच्या उद्देशास बाधा पोहोचत आहे. मदत केंद्रावरील संभाषणाचे ध्वनिमुद्रण करण्यात येत असल्याने उमेदवारांचे आक्षेपार्ह संभाषण आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याच्या, आयोगाच्या कामात गैरवाजवी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न समजून संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगाच्या स्वेच्छाअधिकारानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments