देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे.
कोविड 19 लस नोंदणीसाठी आता को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. आता दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यात बुधवारी तब्बल 24,00,727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झालं आहे. काल दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.