📍 तळेगाव दाभाडे | 15 जून 2025 | Live Update
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. तळेगावजवळील कुंड मळा परिसरात इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून अनेक पर्यटक नदीत पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
➡️ रविवारचा दिवस असल्यामुळे कुंड मळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. पूलावर एकावेळी अनेक लोक उपस्थित असताना अचानक पूल तुटला आणि लोक थेट नदीत कोसळले.
➡️ स्थानिक पोलिस, SDRF व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधमोहीम सुरू आहे. मात्र, इंद्रायणी नदीचा प्रवाह अतिशय जोरदार असल्यामुळे बचावकार्याला अडथळा येत आहे.
➡️ पूल हा दशकांपासून वापरात असलेला पादचारी पूल होता. गेल्या काही वर्षांपासून त्याची स्थिती अत्यंत जीर्ण होती, मात्र प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती, अशी स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
➡️ अनेक पर्यटक बेपत्ता, काहींचे मोबाईल, बॅग्ज, व चपला घटनास्थळी सापडल्या आहेत. मृतांची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट नाही.


