Saturday, March 2, 2024
Homeताजी बातमीBreaking news; पिंपरी-चिंचवड राष्टवादी शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी कविताताई आल्हाट...

Breaking news; पिंपरी-चिंचवड राष्टवादी शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी कविताताई आल्हाट यांची निवड

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांच्या हालचालीना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला शहराध्यक्ष यांच्याबदलाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नवीनचेहऱ्यांना संधी देत शहराध्यक्षपदी माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान युवा नगरसेवक अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश गोरे यांची भगिनी कविताताई आल्हाट व युवक अध्यक्षपदासाठी पानसरे गटाचे इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन युवकांची ‘युवा टीम’ महापालिकेच्यानिवडणुकीत उतरण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील आढावा बैठकीपूर्वीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. याबाबतदुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन सर्व नावांची घोषणा करतील अशी माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments