Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीदिल्ली विमानतळावर पुण्याहून जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी, तपास सुरू

दिल्ली विमानतळावर पुण्याहून जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची धमकी, तपास सुरू

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची सूचना दिल्ली विमानतळ कॉल सेंटरला शुक्रवारी मिळाली, अशी बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली.

फोन करणार्‍याने सांगितले की, “गेट क्रमांक 42 वर उभ्या असलेल्या फ्लाइट क्रमांक UK971 मध्ये तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि ते तासाभरात स्फोट होतील”, पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. लगेच कॉल डिस्कनेक्ट झाला.

यानंतर दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आणि त्यांचे सामान विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.”यादरम्यान, आम्ही आमच्या ग्राहकांना अल्पोपहार देण्यासह त्यांची गैरसोय कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत,” प्रवक्त्याने पुढे सांगितले.

बोर्डिंग सुरू असताना सकाळी 7:30 वाजता बॉम्बची धमकी मिळाली, सूत्रांनी पीटीआयला सांगितले. पोलिसांनी पीटीआयला सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments