पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना गोंधळ झाला. आणि मृतदेहाची आदलाबदल झाली. त्यामुळे चांगलीच धांदल उडाली आहे.संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांची कुमक वाढविली आहे.
अधिक माहिती अशी की, वायसीएममधील डेडहाऊसमधून नेण्यात आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाली. नातेवाईक एकाचा मृतदेह घाईगडबडीत घेऊन गेले. त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केले. पण, तो मृतदेह दुस-याच व्यक्तीचा होता.अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रुग्णालयात आले. पण, त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह दुस-यांनी नेल्याचे त्यांना समजले. आपल्या व्यक्तीच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

त्यांचा मुलगा रोहन गायकवाड यांनी माहिती दिली की, ” घरासमोरील कंपाउंड वॉल पावसामुळे व भुसभुशीत जमिनीमुळे माझ्या आईच्या अंगावर काल पडली. त्यामुळे ती बेशुद्ध झाल्याने तिला जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार साठी नेण्यात आले होते आले होते. तिच्या पाठीचा कणा मोडला होता व खुबा पूर्ण क्रश झाला होता. इंटरनल डॅमेज खूप झाले होते. योनीतून रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिचा मृत्यू झाला. तिथे कोल्ड स्टोरेज नसल्याने आम्ही तिचा मृतदेह वायसीएम मधील डेड हाऊस येथे आणला.”
रोहन गायकवाड म्हणाले की, “सकाळी वाय सी मध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले व आम्हाला स्मशानात देखील देण्यात आला होता. आम्ही मृतदेह घेण्यासाठी आलो तेव्हा पाहिले की तो मृतदेह माझ्या आईचा नव्हता. पण त्या मृतदेहाला लावलेल्या लेबल वरती माझ्या आईचेच नाव – स्नेहलता अशोक गायकवाड होते. आम्ही ही बाब आम्ही सांगितली. काल रात्री डेड हाऊस मध्ये फक्त दोन महिलांचे मृतदेह आले होते. कर्मचाऱ्यांनी एका महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. त्यांना फोन केल्यावर कर्मचारी कळाले की त्या मृतदेहाचे अंतिम संस्कार पुर्ण झाले आहेत. म्हणजेच माझ्या आईच्या मृतदेहवर अंत्यसंस्कार झालेले होते.”
रोहन गायकवाड पुढे म्हणाले कि, ” आमची नातेवाईक गुजरात अकोला व मुंबई येथून आईच्या अंतिम संस्कार साठी आलेले आहेत. पण माझ्या आईच्या मृतदेहावर अंतिम संस्कार दुसऱ्यांनीच केलेले आहेत. आता मी माझ्या नातेवाईकांना काय सांगू? “ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी वाय सी एम चे डीन राजेश वाबळे यांना त्यांचा दालनात या घटनेविषयी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळेस मनपाचे सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेविका सुलोचना धर व इतर मनपा अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले की, “याप्रकरणी दोषी लोकांवर कारवाई करण्यात येईल. पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले कि प्रथम गायकवाड कुटुंबीय जेथे अंत्यसंस्कार झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचे अंत्यविधी पार पाडतील. नातेवाईकांची मन:स्थिती चांगली नसत्याने आपण नंतर त्यांच्याशी बोलून गुन्हा नोंद करू.”