शाळासंदर्भात मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांचं नामांतर करण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील. महापालिकेच्या बजेटवेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं 2021 आणि 2022 चं वार्षिक बजेट जाहीर झालं. या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी 2945 कोटींची तरतूद करण्यात आलीय. यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करताना महापालिकेच्या शाळांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली. आता पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखलं जाणार आहेत.
मुंबई महापालिका दहा नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार आहे. यासाठी बजेटमध्ये पैशांची तरतूद केली गेली आहे.मुंबई शहरात 2, पश्चिम उपनगरात 3, तर पूर्व उपनगरात 5 अश्या एकूण 10 शाळा सुरु करण्याचा मानस मुंबई महापालिकेचा आहे. खासगी शाळांच्या अनुदानासाठी 380 कोटी, शालेय वस्तूंचा मोफत पुरवठ्यासाठी 88 कोटींची तरतूद, उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कॉन्सिलींग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार असल्याचंही बजेटमधून सांगण्यात आलं.