Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमतदार संघातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी - शंकर जगताप 

मतदार संघातील लाडक्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी – शंकर जगताप 

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही; असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा रावेत – किवळे, मामुर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

प्रचाराचा शुभारंभ माळवाडी, आदर्श नगर, भीमाशंकर नगर, दत्तनगर, श्रीनगर, बाबदेव नगर, एम बी कॅम्प, विकास नगर, शिंदे पेट्रोल पंप, वीर बाबाचौक, साईनगर, राऊत नगर, मामुर्डी, आदर्श नगर, सिद्धार्थ नगर, श्री बाप देव महाराज मंदिर, किवळे गावठाण, समीर लॉस येथील सिल्वर लँड सोसायटी, मुकाई चौक येथील कोहिनूर सोसायटी, सिलॅस्टिन सोसायटी, सिल्वर ग्रासिया सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, सिल्वर गार्डनिया सोसायटीमध्ये शंकर जगताप यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी शंकर जगताप यांनी रावेत – किवळे परिसरातील मतदारांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत, समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पदयात्रेत नागरिकांनी “कहो दिल से; महायुती फिरसे”, “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अश्या घोषणा देत परिसर दणदणून सोडला होता.

या दौऱ्यात रावेत गावात झालेल्या बैठकीला सरपंच बाळासाहेब भोंडवे, मधुकर भोंडवे, नंदकुमार भोंडवे, धोंडे मामा भोंडवे, सतीश भोंडवे, तानाजी भोंडवे, दशरथ भोंडवे, राजेंद्र भोंडवे, विजय नाना भोंडवे, विलास भोंडवे, दीपक भोंडवे, पोपट भोंडवे, सोमनाथ भोंडवे, सुरेश तात्या भोंडवे, तुषार भोंडवे, शांताराम भोंडवे, बाबाजी तरस, संदीप भोंडवे, कुणाला भोंडवे, रामभाऊ भोंडवे, शैला पाचपुते, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, वंदना जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

तर पदयात्रेत माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, गणेश झेंडे, अनिल जगताप, धर्मपाल तंतरपाळे, बाळासाहेब तरस, गौतम गायकवाड, दीपक भोंडवे,  माजी सरपंच सुदाम तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे, दादा तरस, दिलीप राऊत, बिट्टू लांगे, नवनाथ लोखंडे, सुधीर साळुंखे, सुमित तरस, बाबाजी तरस, दशरथ साळुंखे, चंद्रकांत तरस, गौरव तरस, नवनाथ जांभुळकर, दत्ता काटकर, काका तरस, मोरेश्वर तरस, दिलीप कडलक, सुनील गायकवाड, संतोष मस्के, पूनम मस्के, करण सौदे, लखन गांधी, इंद्रपाल ऋतू, लखन आगळे, रितेश जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते, महिला भगिनी, जेष्ठ नागरिक, मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments