Friday, June 13, 2025
Homeअर्थविश्वब्लॅक मंडे..!शेअर मार्केट गडगडला, Sensex 1545 अंकांनी घसरला

ब्लॅक मंडे..!शेअर मार्केट गडगडला, Sensex 1545 अंकांनी घसरला

शेअर मार्केटसाठी आजचा दिवस आहे ब्लॅक मंडे ठरला आहे. आजच्या दिवशी शेअर बाजारात शेअर्सची  झपाट्याने विक्री झाल्याचं दिसूनआलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 468 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.62 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,491.51 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,149.10 वर पोहोचला आहे.

आज बाजार बंद होताना सर्वच क्षेत्रात रेड मार्क दिसून आला आहे. ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिअॅलिटीसेक्टरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं या शेअर्सच्या किंमतीत 2 ते 6 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मंगळवारी शेअर बाजारात JSW Steel, Bajaj Finance, Tata Steel, Grasim Industries आणि Hindalco Industries याकंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Cipla and ONGC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली आहे.

दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला होता. निफ्टीतही घसरण दिसून आली. जागतिक बाजारात सुरूअसलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स250 अंकांनी घसरला. ही घसरण दुपारच्या सत्रातही कायम राहिली.

अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments