Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची आढावा बैठक 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची आढावा बैठक 

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली.

या बैठकीला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांसह भाजपचे विविध मोर्चे, सेल्स, मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज वितरण प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश

बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वितरण तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.

• आगामी ५ दिवसांत इच्छुकांचे अर्ज स्वीकारावेत,

• हे अर्ज पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातूनच वितरित केले जावेत,

• अर्जांचा स्वीकार स्वतः शहराध्यक्ष काटे करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

 जनसंपर्काचे सविस्तर नियोजन

पाटील यांनी पुढे सांगितले की—

• प्रत्येक प्रभागनिहाय किमान ५ हजार घरांमध्ये पक्षाचा जाहीरनामा पोहोचवणे,

• संपूर्ण शहरातील ५० हजार नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन

• भाजपच्या सत्ताकाळातील विकासकामांची माहिती

• राज्य व केंद्र सरकारच्या प्रकल्पांची माहिती

पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले.

प्रभागनिहाय बैठका सुरू होणार

पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ प्रभागांमध्ये लवकरच प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार असून, या बैठकींच्या माध्यमातून—

• उमेदवारांची क्षमता तपासणी

• बूथ रचना

• शक्तीकेंद्र रचना

• कार्यप्रणालीचा आढावा

घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

“आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागातील नागरिकांपर्यंत भाजपच्या विकासकामांची माहिती पोहोचवणे आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेणे ही आमची प्राथमिकता आहे. अर्ज वितरण, प्रभागनिहाय बैठक आणि जनसंपर्क मोहिमा प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.” — चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

“महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३२ प्रभागांमध्ये बैठकांचे नियोजन केले आहे. उमेदवारांची क्षमता, बूथ व शक्तीकेंद्र रचना यांचा सखोल आढावा घेतला जाईल. ‘अबकी बार 100 पार’ हा आमचा स्पष्ट संकल्प आहे.” — शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments