Thursday, December 12, 2024
Homeराजकारणचार पैकी ३ राज्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपाची मुसंडी; तेलंगणात काँग्रेसला...

चार पैकी ३ राज्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपाची मुसंडी; तेलंगणात काँग्रेसला बहुमत

चार राज्यांच्या विधानसभेची राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आकरा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेत

मध्य प्रदेश विधाससभेच्या २३० जागा आहेत. भाजपने १५५ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर

छत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर

राजस्थानमध्ये विधासभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. १९६ पैकी ११३ भाजपाने आघाडी घेतली आहे. तर ६९ काँग्रेस आघाडीवर आहे.

तेलंगणात काँग्रेसला बहुमत

तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. काँग्रेस ६६ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल करत आहे. बीआरएसने केवळ ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments