Wednesday, April 24, 2024
Homeताजी बातमीजागेच्या वादावरुन भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीची दादागिरी,  बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेतच केली मारहाण

जागेच्या वादावरुन भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीची दादागिरी,  बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेतच केली मारहाण

बोऱ्हाडे वाडी येथील जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे  यांचे पती नितीन बोऱ्हाडे आणि बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांच्यात पिंपरी महापालिकेतच बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि बोऱ्हाडे यांनी पटेल यांच्या कानशिलात लगविली. ही घटना आज (बुधवारी) पिंपरी महापालिकेच्या पार्कींगमध्ये घडली. याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार देण्यात आली नाही.

नितीन बोऱ्हाडे यांचे चुलते आणि नरेश पटेल यांची  बोऱ्हाडेवाडीतील सर्व्हे नंबर 644 मध्ये शेजारी-शेजारी जागा (Bjp) आहे. या जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरून त्यांच्यात वाद सुरु आहे. त्याबाबत आज महापालिकेत सुनावणी होती.

सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. बोऱ्हाडे यांनी पटेल यांच्या कानशिलात मारली. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ मध्यस्थी करत बोऱ्हाडे यांना रोखले.

नरेश पटेल आणि चुलत्यामध्ये जागेवरून वाद सुरू आहे. तो सोडवण्यासाठी मी मध्ये गेलो होतो. पटेल यांच्याकडून जागा बळकाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची भाषा अरेरावीची होती.  त्यातून झटापटी झाल्याचे नितीन बोऱ्हाडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments