Tuesday, January 13, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा मोठा राजकीय धक्का; विविध पक्षांतील २२ मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीत...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा मोठा राजकीय धक्का; विविध पक्षांतील २२ मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून शिवसेना (उभाठा), राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकास, स्थैर्य आणि सक्षम प्रशासनासाठी भाजपात प्रवेश केल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपात प्रवेश केलेल्या मान्यवरांची यादी पुढीलप्रमाणे :

1. माजी महापौर व उभाठा गटाचे नेते – श्री संजोगजी वाघेरे पाटील

2. माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे

3. राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे

4. राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री विनोद नढे

5. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री प्रभाकर वाघेरे

6. माजी उपमहापौर – श्री राजू मिसाळ

7. उभाठा गटाचे नगरसेवक – श्री अमित गावडे

8. उभाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव

9. श्री रवी लांडगे

10. माजी नगरसेवक – श्री संजय नाना काटे

11. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी

12. श्री प्रविण भालेकर

13. श्री जालिंदर बापू शिंदे

14. श्री सचिन सानप (स्वतः व पत्नी)

15. श्री दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)

16. श्री सदगुरु कदम

17. श्री समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)

18. डॉ. श्री सुहास कांबळे

19. श्री कुशाग्र कदम

20. श्री अशोक मगर

21. श्री नागेश गवळी

22. श्री प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक

     23. नवनाथ जगताप 

या सामूहिक प्रवेशामुळे भाजपाची शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments