Tuesday, February 27, 2024
Homeराजकारणनिर्भय बनो च्या सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप...

निर्भय बनो च्या सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

गेली ४० वर्षे आपल्या निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड सवाल करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. पुण्यातील डेक्कन भागातील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीला भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती. परंतु रस्त्यातच त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

हल्ल्यानंतरही वागळे सभास्थळी

गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहे. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केलंय. निखिल वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला.

पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तरीही वागळे यांच्यावर हल्ला

निखिल वागळे यांची सायंकाळी ६ वाजता नियोजित सभा होती. परंतु ही सभा होऊ नये, यासाठी भाजपचा तीव्र विरोध होता. निखिल वागळे जेव्हा सभास्थळी जायला निघाले, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसही होते. परंतु पोलिसांची सुरक्षा असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीला दगडांनी लक्ष्य केल्याने पुण्यातील परिवर्तवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments