Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमी"पश्चिम बंगालमध्ये भाजपा १०० जागांच्या पलिकडे जाणार नाही"; व्हायरल ऑडिओ क्लिपवरून प्रशांत...

“पश्चिम बंगालमध्ये भाजपा १०० जागांच्या पलिकडे जाणार नाही”; व्हायरल ऑडिओ क्लिपवरून प्रशांत किशोर यांची भाजपावर टीका

देशात पाच राज्यांत होत असलेल्या निवडणुकींपैकी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणूकीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले डावपेच टाकण्यास सुरूवात केली आहे. यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप भाजपाच्या आयटी सेलकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकत असल्याचं किशोर यांनी मान्य केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आल्यानंतर प्रशांत किशोरी यांनी हे सगळं खोटं असल्याचं सांगत भाजपाला आव्हान दिलं आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी क्लब हाऊस अॅपवरील चर्चेचा एक व्हिडीओ ट्विट करून बंगालमध्ये भाजपा जिंकत असल्याचा दावा केला. क्लब हाऊन अॅपवर सुरू असलेल्या चर्चेच्या या ऑडिओ क्लिप असून, यात ममतांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये प्रशांत किशोर हे मोदींच्या नावावर मत पडत असल्याचं, हिंदूंच्या नावावर मत पडत असल्याचं म्हणताना ऐकालयला येत आहे. ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या ऑडिओ क्लिपवरून प्रशांत किशोर यांनी भाजपावर टीका केली आहे. “हे बघून मला जाणून आनंद झाला की, भाजपा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपेक्षा आपल्या बोलण्याला जास्त गंभीरपणे घेतात. त्यांनी धाडस दाखवावं आणि निवडक संवादाऐवजी पूर्ण ऑडिओ शेअर करावा. मी यापूर्वीही बोललो आहे आणि पुन्हा बोलतोय पश्चिम बंगालमध्ये भाजपा १०० जागांच्या पलिकडे जाणार नाही,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments