Thursday, May 15, 2025
Homeताजी बातमीतीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे. तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. भाजपाच्या झालेल्या बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली होती.

तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. खासदार तीरथ रावत हे उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. रावत सध्या भाजपाचे राष्ट्रीय सचिव आहेत.

उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे तक्रार केली होती. त्याचदरम्यान रावत यांची मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments