Monday, July 20, 2026
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड मध्ये भाजपला गळती…! आणखी एका नगरसेविकेने दिला राजीनामा

पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपला गळती…! आणखी एका नगरसेविकेने दिला राजीनामा

महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपला मोठी गळती लागली आहे. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चंदा लोखंडे या आणखी एका नगरसेविकेने राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा धक्काबसला आहे. ही गळती थांबविण्यासाठी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या कट्टर समर्थक भाजपा नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती चंदा लोखंडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज सोमवारी (दि. २१) रोजी सुपूर्द केला आहे.

आयुक्तांना दिलेल्या राजीनामा पत्रात ”मी चंदा राजू लोखंडे भाजप पक्षाच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक २९ ‘ ड ‘ मधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१७ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये निवडून आलेली आहे. आज दिनांक २१/०२/२०२२ रोजी मी माझ्या वैयक्तीक कारणामुळे नगरसदस्यपदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारण्यात यावा”, असे त्यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाऊ नये, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपमधील काही नाराजनगरसेवकांना केली आहे. नाराज नगरसेवकांना त्यांनी स्वतः फोन करून ही विनंती केली, अशी विश्‍वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील जवळपास पंधरा-सोळा नाराज नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेशकरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडभाजपमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असणार आहे. भाजपमध्ये नागरिकांची विकास कामे करण्यात अनेक अडचणी येत असल्याने आम्ही पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वसंत बोऱ्हाडे यांनी सांगितले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments