Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमी‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे भाजपाने सिध्द करावे- सचिन साठे

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे भाजपाने सिध्द करावे- सचिन साठे

१९ ऑगस्ट २०२१,
स्थायी समितीतील इतर पक्षीय सदस्यांनी कारवाई बाबत खुलासा करावा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केलेली कारवाई ही शहराच्या नावलौकिकास काळीमा फासणारी घटना आहे. भाजपाच्या अखत्यारीत असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हातात हात घालून संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. प्रदेश भाजपाने व स्थानिक भाजपा पदाधिका-यांनी या धोरणाचे पाईक आहोत हे सिध्द करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी कारवाई करुन अध्यक्षांसह इतर चार कर्मचा-यांना अटक केली. एवढी मोठी कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. या प्रकरणाबाबत स्थायी समितीतील इतर पक्षीय सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर खुलासा करुन नागरीकांना अवगत करावे. जनतेच्या कर रुपी पैशांची ही लूट आहे. महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपासून उच्चपदस्थ अधिका-यांपर्यंत सर्वांचाच भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे दिसते. राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करुन मागील चाडेचार वर्षातील आर्थिक उलाढालीची निपक्षपणे चौकशी करावी, अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments