03 November 2020
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांनी अमिताभ बच्चन ह्याच्या विरोधात लातूर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
सोनी वाहिनीवरील KBC मालिकेत अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहेत. ३० ऑक्टोबरच्या कार्यक्रमात सहभागी असलेले विल्सन आणि अनुप सोनी ह्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. २५ डिसेंबर १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनुयायांनी कुठला धर्मग्रंथ जाळला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये मनुस्मुती, भगवत गीता, विष्णुपुराण,ऋग्वेद असे पर्याय देण्यात आले होते.
हा प्रश्न विचारून हिंदू धर्मीय आणि बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात पहिला जात असल्याने अशा पद्धतीचा प्रश्न हा हिंदू धर्म,धर्मग्रंथ,धर्मनिष्ठा यांचा अपमान करून हिंदूं धर्मियांच्या भावना दुखावणे हेच उद्दिष्ट असल्याचे दिसत आहे असा त्यांनी आरोप केला आहे.
KBC फेम अमिताभ बच्चन ह्यांच्या विरोधात भाजप आमदाराची पोलिसात तक्रार
RELATED ARTICLES